तौक्ते चक्रीवादळानंतर आता महाराष्ट्राला नव्या 'शाहीन' चक्रीवादळाचा धोका

  • 3 years ago
सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडतोय. खरं तर हे वादळ निवळले असून, त्याचं रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झालं आहे. त्याचमुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला असून विदर्भासहीत अनेक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतोय. राज्यात पुढील काही तासांत या चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दिसणार आहे.

#Maharashtra #Cyclone #GulabCyclone #IMD

Recommended