भटक्या कुत्र्यांचा वास झालाय रहिवाश्यांचा त्रास | Stray Dogs Have Become a Nuisance to Residents

  • 3 years ago
पुण्यातील हिंजवडी, माण, मुळशी या परिसरात आयटी कंपन्यांचं प्रमुख जाळं आहे. पुण्यातील तर काही पुण्याबाहेरचे लाखो लोक या आयटी हबमध्ये कामाला आहेत. यापैकी कित्येकजण कुटुंबासह इथंच स्थायिक झालेत. सगळा नोकरदार वर्ग असल्यानं या भागात मोठमोठे हॉटेल्स दिमतीला आहेत. पण या सोयीचा आता उलट परिणाम इथल्या रहिवाश्यांना भोगावा लागत आहे. लॉकडाऊनपूर्वीपर्यंत या भागात हॉटेल्सनी उर्वरित मांसाहार फेकून दिला की त्यावर भटकी कुत्री तुटून पडायची. त्यामुळे कुत्र्यांना मांसाहार खाण्याची सवय लागली. पण गेल्या आठ महिन्यात लॉकडाऊनमुळे हॉटेल्स बंद. त्यामुळे हा मांसाहार मिळणं बंद झाला आणि ही कुत्री पिसाळली. सतत मांस खाण्याची सवय लागल्यानं त्याच खाद्याच्या शोधात ही कुत्री लोकांवर हल्ले करायला लागली.
रात्री तर सोडाच पण दिवसाही इथल्या लोकांना इथल्या रस्त्यांवरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अगदी काही दिवसांपूर्वी हिंजवडीत पार्किंगमधून जाणाऱ्या मुलीच्या शरीराचे लचके तोडणं असो किंवा लहान मुलांसह सहा जणांवर पिसाळलेल्या कुत्र्यांनी हल्ला करणं. अशा अनेक घटनांना लोकमतनं वेळोवेळी पुढे आणलं आहे. लोकमतचे स्थानिक प्रतिनिधी रोहिदास धुमाळ यांनी वेळोवेळी या घटनांचं वृत्त दिलंय. पण ढिम्म प्रशासन कुणी मदत करेल का? याच प्रतीक्षेत बसलंय.

#lokmat #Straydogs #Hinjewadi #Maan # Punenew
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended