शेअर बाजारात मंदी | Axis Bank धोक्यात ? Corona And Lockdown Effects | India News

  • 3 years ago
शेअर बाजारात मंदी आहे. अनेक गुंतवणूकदार धास्तावले आहेत. आपल्या मेहनतीच्या कमाईचे पैसे राहतात की जातात अशी स्थिती आहे. अगदी क्षणा क्षणाला क्रिकेटचा स्कोअर पाहावा तसं सामान्य गुंतवणूकदार शेअर बाजाराच्या निर्देशांकाची चौकशी करतोय. अशा वातावरणात केंद्र सरकारनी अँक्सीस बँक, आयटीसी या कंपन्यामधला आपला वाटा विकून २२ हजार कोटी रूपये उभे करण्याचे मनसुबे रचले आहेत. ईकॉनॉमिक टाईम्सनी दिलेल्या वृत्तानुसार हा व्यवहार याच आठवड्यात पूर्ण होणार आहे. जिथे सामान्य माणूस अत्यंत सावधतेनी शेअर बाजारात गुंतवणूक करत असताना शेअर बाजार कोसळलेल्या अवस्थेत आपले समभाग विकण्याचा आत्मघाती निर्णय सरकारनी का घेतला, हे सामान्य माणसाच्या आकलना पलिकडचं आहे. पूर्वीच्या काळी युनीट ट्रस्ट ऑफ ईंडिया नावाची केंद्र सरकारची एक बँक होती. ती स्पेसीफाईड अंडरटेकिंग ऑफ युनीट ट्रस्ट ऑफ ईंडिया म्हणजेच एसयुयुटीआय या नव्या कंपनीच्या मार्फत केंद्रानी सिगरेट विकणाऱ्या आयटीसी आणि अँक्सीस बँकेत समभाग विकत घेतले होते. आयटीसीमध्ये केंद्राचे ७.९४ टक्के तर अॅक्सीस बँकेत ४.६९ टक्के समभाग होते. हे समभाग विकून २२ हजार कोटी रूपये उभारण्यात येत आहेत. बाजारात मंदी असताना केंद्र सरकारनी असा निर्णय का घेतला, हे सांगताहेत बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ विश्वास उटगी ...

#LokmatNews #axisbank #lockdown #coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended