MNS चे सरचिटणीस Sandeep Deshpande यांना पोलीस ताब्यात घेताना | Mumbai

  • 3 years ago
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आले आहे. तसेच त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता ते ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होईल, असे कोणतेही कृत्य मनसेच्या कार्यकर्त्यांनी करू नये, यासाठी मनसेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेत अडथळा आणला तर कडक कारवाई केली जाईल अशा इशाराही पोलिसांनी दिला आहे. याआधी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर सुरुवातीला ठाणे बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. त्याचप्रमाणे २२ ऑगस्टला कार्यकर्ते आणि नेत्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर जमण्याचं आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत केलं होतं. पण काही वेळातच राज ठाकरे यांच्या आदेशानंतर हा निर्णयही मागे घेण्यात आला होता. मात्र यानंतरही कार्यकर्ते कायदा हातात घेण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी नोटीस बजावली होती.

याच पार्श्वभूमीवर आज (गुरूवार) मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे. सकाळच्या सुमारास ते जॉगिंगला आले असतानाच पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी त्यांना ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे.


आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Mumbai
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended