Special Report : अन् भूतांचे विश्व उलगडले ! world of ghosts unfolded!

  • 3 years ago
नवी मुंबई  - पनवेल येथील काळूंद्रे गावातील स्मशानभूमीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित स्मशानसहल पार पडली. शनिवारी मृत्यूंजय अमावस्येच्या मध्यरात्री सरणाशेजारी बसून भूत म्हणजे काय , भूत-आत्म्याच्या संकल्पना , स्मशानात येताना मनात असलेली भीती अशा विविध विषयांवर गप्पा मारल्या. अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते , मानसोपचारतज्ज्ञ डॉ.प्रदीप पाटकर यांची संकल्पना असलेल्या शोध भूताचा..बोध मनाचा या उपक्रमाला मुंबईप्रमाणेच भायखळा, घाटकोपर, वसई, कर्जत, मुलूंड, कांजूरमार्ग अशा विविध भागांतून तरुणाईने उपस्थिती दर्शविली होती. यावेळी अंनिसचे कार्यकर्ते मनोहर तांडेल यांनी उपस्थितांना चमत्कारांचे सादरीकरण करुन दाखविले, या प्रात्यक्षिकांचा अनुभव उपक्रमातील सहभागींनीही घेतला. याप्रसंगी, स्मशानात महिलांना प्रवेश निषिद्ध असून महिलांची उपस्थीतीही उल्लेखनीय होती.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended