Lokmat Sport Update | मृत्यूवर मातकरून परतली टेनिसपटू SERENA WILLIAMS | Lokmat Marathi News

  • 3 years ago
आज प्रसिद्ध टेनिसपटू सेरेना विल्यम्स बोलती झाली.मी मुलीला जन्म दिल्यानंतर मेलेच होते. मुलीच्या जन्मादरम्यान हृद्याचे ठोके मंदावले होते. यावेळी सिझेरियन करावे लागले. ऑपरेशन यशस्वी झाले. सेरेना म्हणाली, मात्र आई झाल्यानंतर पुढच्या २४ तासांतच असे काही घडले ज्यामुळे त्यापुढील ६ दिवस अनिश्चिततेचे होते. आई बनल्यानंतर फुफ्फुसाच्या एक अथवा अधिक धमन्यांमध्ये ब्लड क्लॉट झाले होते.यावेळी सेरेना मृत्यूच्या दाराशीच जणू उभी होती. मात्र सुदैवाने सेरेनाची तब्येत सुधारली आणि मृत्यूचा चकवा देत ती परतली. याआधी २०११ मध्ये म्युनिच येथील रेस्टॉरंटमध्ये ग्लास तुटल्याने तिच्या पायाला जखम झाली होती. त्यानंतर तब्बल एक वर्ष तिला फुफ्फुसांच्या धमन्यांमध्ये ब्लड क्लॉटिंगच्या समस्येने ग्रासले होते.याआधीही ब्लड क्लॉटिंगची समस्या सतावल्याने मी मुलीच्या जन्माच्या वेळी घाबरले होते.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended