अकोला: रामदास पेठ पोलीस ठाण्याला लागून असलेल्या मातानगरमध्ये गुरुवारी दुपारी भीषण आग लागून पाच ते सहा सिलींडरचा स्फोट झाला. आगीच्या तांडवात ५० पेक्षा अधिक झोपडया जळून खाक झाल्या असून मोठी आर्थिक हानी झाली आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
माता नगर झोपडपट्टीत अचानक एका घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर या घराला असलेल्या कुळाच्या काठया व लाकड जळाल्याने ही आग आजुबाजुच्या झोपड्यांना लागली. यामध्ये तब्बल ५ च्यावर झोपड्यांमधील सिलिंडरचा स्फोट झाल्याने माता नगरातील संपूर्ण झोपडपट्टया आगीत सापडल्या.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews