Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
ख्यातनाम शहनाईवादक भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचे तिसरे पुत्र उस्ताद जामिन खाँ यांचं आज निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. शनिवारी सकाळी काली महल स्थित राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी, पाच मुली आणि एक मुलगा आफाक हैदर असा परिवार आहे. जामिन यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना किडनीचा आजार होता. तर, गेल्या दोन वर्षांपासून ते मधुमेह आणि इतर आजारांचा सामना करत होते.उस्ताद जामिन हुसैन यांनी आपल्या शहनाई वादनाने सर्वांचीच दाद मिळवली होती. त्यांच्या शहनाई वादनाचे देश-विदेशात चाहते होते. त्यामुळे जामिन यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended