ह्याला म्हणतात नशीब ३० जण करतात Google साठी हे मजेशीर काम | Lokmat International News | Lokmat

  • 3 years ago
गुगलच्या कर्मचाऱ्यांना पार्कमध्ये फेरफटका मारण्यासाठी गुगलने खास हजारो सायकल्स कॅम्पसमध्ये ठेवल्या आहेत. या सायकल कंपनीच्या लोगोच्या रंगात रंगवलेल्या आहेत. याला गुगलने जीबाईक्स असे नाव दिले आहे. कर्मचारी या जीबाईक्स चालवतात. पण गेल्या काही दिवसांपासून या सायकल्सच्या संख्येत घट होत आहे. आठवड्याला किमान १०० ते २५० सायकल्स चोरी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे या चोऱ्या थांबवण्यासाठी गुगलने ३० जणांची नेमणूक केली आहे. सायकल्सवर लक्ष ठेवणं, हरवलेल्या सायकल्स शोधून परत मिळवणं असं या कर्मचाऱ्यां च्या कामाचं स्वरूप असेल.
सायकल चोरी थांबवण्या साठी गुगल आता नवीन तंत्रज्ञान विकसित करणार आहे. यासाठी गुगलने आधुनिक तंत्रज्ञान युक्त लॉक तयार केले आहेत. जे लॉक फक्त गुगलचे कर्मचारी मोबाईलच्या माध्यमातून उघडू शकतात. मात्र हे तंत्रज्ञान लागू होण्यासाठी काही कालावधी लागेल. म्हणून तुर्तास जीबाईक्सची चोरी थांबवण्यासाठी गुगलने ३० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended