Latest Lokmat Update | Abhinav Bindra याच्या जीवनप्रवासावरील चित्रपटात दिसणार हा अभिनेता | Lokmat

  • 3 years ago
बायोपिकच्या शर्यतींमध्ये आता झक्कास अभिनेता अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन याचेही नाव जोडले गेले आहे. ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याच्या जीवनप्रवासावरील चित्रपटात हर्षवर्धन मुख्य भूमिकेत दिसेल. चित्रपटाची कथा पूर्ण झाली असून, याच वर्षी चित्रीकरणालाही सुरुवात होईल. स्वतः हर्षवर्धननेच याविषयीचे ट्विट करत आपल्या चाहत्यांना माहिती दिली. अभिनवसोबत स्क्रिप्टचा फोटो शेअर करत त्याने लिहिलं की, ‘आपले संपूर्ण आयुष्य परफेक्शनसाठी खर्ची घालणाऱ्या अभिनव बिंद्राच्या अपेक्षा पूर्ण करणे तसे कठीणच आहे. पण, चित्रपटाची कथा वाचून तो संतुष्ट आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल.’ हर्षवर्धनचे हे ट्विट पाहता अभिनव त्याच्या चित्रपटाच्या कथेविषयी बराच सतर्क आणि सजग असल्याचे दिसते. आपल्या खेळाप्रमाणेच त्याने यातही परफेक्शन दाखवले आहे. कन्नन अय्यर या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहे. अभिनवच्याच ‘अ शॉट अॅट हिस्टरी : माय ऑब्सेसिव्ह जर्नी टू ऑलिम्पिक गोल्ड’ पुस्तकावर चित्रपटाची कथा आधारित आहे. हे पुस्तक अभिनवसह रोहित ब्रिजनाथ याने लिहिले आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews