मानवतेला काळिमा फासणारे कृत्य । व्हिडिओ पाहून व्हाल थक्क | Lokmat latest Update | Lokmat News

  • 3 years ago
गुजरातमध्ये एका प्रोफेसरने मुलाने आपल्या आईची छतावरून फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संदिप नाथवानी असे या मुलाचे नाव असून, त्याची आई तीन महिने ब्रेन हॅमरेजमुळे अंथरुणावर पडून असल्याने आईच्या उपचार आणि देखभालीमुळे तो त्रस्त झाला होता. आईच्या आजारपणाला कंटाळल्याने आपण हे पाऊल उचचल्याचे संदिपने म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सप्टेंबर महिन्यात घडली. परंतु, या घटनेचा खुलासा गुरुवारी झाला. एका निनावी चिठ्ठीनंतर पोलिसांनी सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा मुलगा आईला छतावर घेऊन जात असल्याचे पोलिसांना अढळले. पोलिसांनी मुलाची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended