विमानांचा रंग पांढरा का असेल बर ? जाणून घ्या उत्तर | पहा हा व्हिडिओ | Lokmat News

  • 3 years ago
आपण दररोज अवकाशात उंचच उंच झेपावणारी विमाने बघतो. त्यावेळी आपल्या मनात अनेक विचार
येतात, अनेक प्रश्न पडतात, कि विमान कसे उडते, ते एवढ्या उंचावर कसे उडते, त्याचा रंग पांढरा का?
तर पांढरा रंग इतर रंगाच्या तुलनेत उष्णतेला दूर ठेवतो. त्यामुळे कोणत्याही तापमानात विमान थंड
राहावे ह्यासाठी विमानाचा रंग पांढरा असतो. काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. ज्यामुळे उष्णता काही
पटीने वाढते. शिवाय पांढऱ्या रंगामुळे विमानात झालेला बिघाड, तेलगळती, लवकर कळून येते. शिवाय
पूर्ण विमानाला रंग देण्यासाठी साधारणतः ३ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो. परंतु इतर रंग जर
मारले तर हाच खर्च अजून वाढेल. त्यामुळे पांढऱ्या रंगाला प्राधान्य दिले जाते.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended