पेटीएम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी एकत्रितपणे एक कॅशबॅक ऑफर आणली आहे. आता पेट्रोल, डिझेल च्या खरेदीवर ग्राहकांना 50% कॅशबॅक मिळणार आहे. या सवलतीचा फायदा हिंदुस्तान पेट्रोलियमच्या कोणत्याही पंपावर घेता येणार आहे.मात्र यासाठी ग्राहकांना पेटीएम द्वारे पैसे भरणे आणि त्याचबरोबर 300 रुपयांचं पेट्रोल भरणं अनिवार्य असणार आहे. त्यानंतर प्रत्येक आठवड्याला लकी ड्रा काढण्यात येईल. त्यात तीन नावे जाहीर केली जातील. त्या लकी विजेत्यां ना पेट्रोल, डिझेलवर 50% कॅशबॅक मिळेल. त्यांच्या खात्यात 150 रूपये जमा केले जातील. ही सवलत फक्त 28 डिसेंबरपर्यंत असणार आहे.तसंच प्रत्येक ग्राहकाला 5% अतिरिक्त कॅशबॅक मिळेल.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews