संगीताची राजधानी दीड कोटी लोकांनी घेतला आस्वाद | Lokmat Marathi News

  • 3 years ago
संगीतकारांसाठी, गायकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधा, कानसेनांना संगीताचा मनमुक्त आनंद लुटण्याची संधी यामुळे अमेरिकेतील टेनेसी प्रांताची राजधानी असलेले नॅशविल टेनेसी या शहराला जणू संगीताच्या जागतिक राजधानीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.नॅशविल टेनेसीची संगीत क्षेत्रातील ख्याती माहिती असल्याने जगभरातील सुमारे दीड कोटी पर्यटकांनी या वर्षी या शहराची पायधूळ झाडली. केवळ संगीतच नाही, तर फॅशनबाबतही आज या शहराने मोठे स्थान मिळवले आहे.मूळच्या मुंबईच्या असलेल्या प्रा. अनिता महादेवन या वेंडरबिल्ट इंजिनीअरिंग कॉलेजात प्राध्यापक आहेत. आपण आज मुंबईचे सिंगापूर करू बघत आहोत... बनारसचे जपान करू पाहात आहोत. त्यात आपण आपली मूळ संस्कृती विसरत चाललो आहोत. मात्र येथे बघा. येथील लोकांनी आपली मूळ संगीतसंस्कृती केवळ जपलेलीच नाही, तर ती अधिकाधिक समृद्ध केली आहे, अशी टिप्पणी अनिता यांनी केली.सुरांचे साम्राज्य
नॅशविल टेनेसी शहरावर पूर्णपणे सुरांचे साम्राज्य असते. रस्त्यांवर, रस्त्याच्या वळणांवर संगीतकलाकार गायनात, वादनात रमलेले दिसतात. विविध सभागृहांत संगीताचे कार्यक्रम सुरू असतात आणि त्यांचा आस्वाद विनामूल्य घेता येतो.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended