मणिशंकर माझी सुपारी द्यायला पाकमध्ये गेले होते का?मोदींचा खरमरीत सवाल | Lokmat Marathi News

  • 3 years ago
काँग्रेसचे बडतर्फ नेते मणिशंकर अय्यर यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जोरदार हल्ला चढवला. `मी पंतप्रधान झाल्यानंतर हेच मणिशंकर अय्यर पाकिस्तानात गेले होते.मला पंतप्रधान पदावरून हटविण्यासाठी पाकिस्तानी नेत्यांशी त्यांनी चर्चा केली,’ असा आरोप करतानाच `अय्यर तुम्ही पाकिस्तानात माझी सुपारी देण्यासाठी गेला होतात काय?’, असा खोचक सवाल मोदी यांनी केला.भाभर येथे निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. मी सत्तेत येताच अय्यर पाकिस्तानात गेले आणि त्यांनी पाक नेत्यांशी चर्चा केली. मोदी सत्तेत आलेत त्यांना हटविले नाही तर भारत-पाक संबंध कधीच सुधारणार नाहीत असे त्यांनी पाक नेत्यांना सांगितले. पाकिस्तानात जाऊन हे मोदींना हटविण्याची भाषा करत होते, असे ते म्हणाले.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended