त्या' वाक्यामुळे पाकिस्तानी युवकाला अटक! घराच्या भिंतीवर त्याने काय लिहिले होते | पाहा हा वीडियो

  • 3 years ago
भारताच्या शेजारील देश म्हणजे पाकिस्तानमध्ये एका मुलाने घराच्या भिंतीवर 'हिंदुस्तान ज़िंदाबाद' लिहील्यामुळे पोलीसांनी त्याला अटक केली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, हा 20 वर्षीय युवक एका फॅक्ट्रीत काम करतो. एका मुलाने घरात भारताचे समर्थन करणारे वाक्य लिहील्याची खबर पोलीसांना लागली होती. पोलीसांनी तातडीने छापा टाकून त्याला अटक केली. ही घटना पाकीस्तानातील खैबर-पख्तूनख्वा येथील हरिपूर भागातील आहे.
हा मुलगा बॉलीवूड चित्रपटांचा खूप मोठा फॅन असून त्याला अॅक्टर व्हायचे आहे. साजिद शाह असे याचे नाव आहे. शेजारील लोकांनी राष्ट्रीय सम्मान जपण्यासाठी त्याने लिहीलेले हे वाक्य पुसण्यास सांगितले. पण त्याने तसे केले नाही.गेल्या वर्षी विराट कोहलीचा फॅन असलेल्या एकाने तिरंगा फडकवल्याने त्याला अटक करण्यात आले होते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews