ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं सोमवारी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच शशी कपूर यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली वाहायला सुरुवात केली. परंतु, शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहताना नावातील साधर्म्यामुळं अनेक नेटिझन्स थेट काँग्रेस नेते शशी थरूर यांनाच आदरांजली वाहून मोकळे झाले. हे प्रकरण इतकं वाढलं की खुद्द शशी थरूर यांनाच पुढाकार घेऊन 'मी आहे रे, शशी कपूर गेलेत' असं म्हणण्याची वेळ आली.
सोशल मीडियावर झालेला हा नावातील गोंधळ एवढ्यावरच थांबला नाही. थरूर यांच्या कार्यालयातील फोन दिवसभर खणखणत होते. ट्विटरवरसुद्धा अनेकांनी थरूर यांना आजरांजली वाहायला सुरुवात केली. शेवटी शशी थरूर यांनीच ट्विट करत सगळ्या अफवांना पूर्णविराम दिला. 'शोक व्यक्त करण्यासाठी माझ्या कार्यालयात अनेकांचे फोन येत आहेत. परंतु, ही बातमी चुकीची आहे. अनेकांनी फार लवकरच मला मारून टाकले,' असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews