रजनीकांत लवकरच करणार राजकारणात प्रवेश | Political News | Lokmat News

  • 3 years ago
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत राजकारणात येणार अशी चर्चा सुरु असताना ते लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याचे संकेत सध्या देण्यात आले आहेत. रजनीकांत हे येत्या जानेवारी महिन्यात आपली पुढील दिशा ठरवणार असल्याचे सांगितले जात आहे.
रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. मात्र, त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे या चर्चा काहीकाळ थांबल्या होत्या. त्यानंतर आता त्याचे बंधू सत्यनारायण राव गायकवाड यांनी रजनीकांत जानेवारी महिन्यात राजकारणात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, या बाबतचा अंतिम निर्णय रजनीकांत स्वतः जानेवारीमध्ये जाहीर करतील असे सांगण्यात आले.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended