आलिया भट्टने घेतली महागडी कार गाडीची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल | Alia Bhatt News

  • 3 years ago
आपल्या सिनेमांसाठी आलिया भट्ट नेहमीच चर्चेत असते. पण यावेळी ती कोणत्या सिनेमासाठी नाही तर चक्क तिच्या गाडीसाठी चर्चेत आली आहे. नुकतीच तिने एक नवीन गाडी खरेदी केली आहे. भारतातील महागड्या गाड्यांपैकी एक गाडी तिने स्वतःसाठी खरेदी केली आहे.जगभरात लग्झरी गाड्यांची विक्री करणारी कंपनी रेंज रोवरची नवीन गाडी तिने विकत घेतली आहे. रेंज रोव्हर कंपनीची एसयूव्ही ‘वोग’ ही गाडी तिने विकत घेतली आहे. या गाडीची किंमत वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल यात काही शंका नाही. आलियाने या गाडीसाठी तब्बल 2 कोटी रुपयांची किंमत मोजली आहे. दिल्लीमध्ये या गाडीची एक्स शोरुम किंमत 1.88 कोटी रुपये आहे. आतापर्यंत आलिया ऑडीची ‘क्यू ५’ ही गाडी वापरत होती. आलियाने घेतली ही गाडी अभिनेता रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्याकडेही आहे.आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended