जगात अब्जावधींची लोकसंख्या आणि फक्त 1% श्रीमंतांकडे जगातील अर्धी संपत्ती | International Update

  • 3 years ago
जगात श्रीमंत अधिक श्रीमंत होवू लागले आहेत आणि गरीब अजून पिचला जात आहे. जगातील श्रीमंत आणि गरीब ह्यातल्या दरीची सत्यता सामोर आणणाऱ्या एका रिपोर्ट नुसार फक्त 1% श्रीमातांकडे जगातील अर्धी संपत्ती आहे. अभ्यासानुसार हे सुद्धा सिद्ध झाले झाले आहे कि 2008 च्या मंदीनंतर श्रीमंतांचा खुप फायदा झाला. आणि जगातील एकूण संपत्तीमध्ये त्यांचा हिस्सा 42.5 टक्क्यांवरून 50.1 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. क्रेडीट सुइस ग्लोबल वेल्थ रिपोर्ट नुसार सगळ्यात जास्त श्रीमंत 1% लोकांकडे 106 ट्रीलीयन ब्रिटीश पाउंड्स म्हणजे 90,93,210 अब्ज रुपयांची संपत्ती आहे. म्हणजे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या 8 पट. आणि त्याच्याही पुढे जावून विचार केला तर 10 टक्के लोकांकडे जगातल्या एकूण संपत्ती पैकी 87.8 टक्के संपत्ती आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews