सौदी अरबचा अब्जाधीश राजकुमार अल्वालीद बिन तलाल यांना अटक केल्यानंतर त्याचे ग्रह फिरले आहेत. सौदिच्या या राजकुमाराला अटक झाल्यांनतर अवघ्या 48 तासात त्याला 78 अब्ज रुपये गमवावे लागले आहेत. तलाल याला अटक केल्यानंतर त्याच्या किंगडम होल्डिंग कंपनी चे मार्केट कोसळले आहे. त्यांच्या ह्या कंपनीचे बाजारमूल्य 19* बिलियन डॉलरने घटून 17.8 बिलियन डॉलर एवढे झाले आहे. या कंपनीने गेल्या सहा वर्षातील सर्वात निच्चांक गाठला आहे. ह्या कंपनीमध्ये तलालचे 95 टक्के शेअर आहेत. त्याचे बाजारमूल्य 9.6 बिलियन डॉलर इतके आहे. म्हणजे सुमारे 62 हजार 450 कोटी रुपये इतकी हि रक्कम आहे. त्यात सौदी अरेबियातील त्याची मालमत्ता, कंपनीत गुंतवलेली रक्कम, मध्य पुर्वेतून आलेली गुंतवणूक, विमान, याट आणि सोने चांदीचा समावेश आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली राजकुमाराला अटक करण्यात आली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews