Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 9/13/2021
पटेल पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचा एका तरुणीसोबत आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. गुजरात मधील निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतांनाच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गुजरात मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत असून प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुजरात मध्ये तळ ठोकला आहे. भाजपा चा किल्ला समजल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये भाजपा वर टीका करण्याची एकही संधी हार्दिक पटेल सध्या सोडत नाही. भाजपा विरुद्ध हार्दिक पटेल यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु असतांना हार्दिक पटेलचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक हॉटेलमध्ये एका महिलेसोबत बसला आहे, ती तरुणी कोण? व्हिडीओतला व्यक्ती खरच हर्दिकच आहे का असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended