Salman Khan चा Tiger Zinda Hai च्या ट्रेलरची गगनभेदी डरकाळी | Salman Khan Latest News

  • 3 years ago
सलमान खानच्या टायगर जिंदा हैची चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. त्याच्यासोबत कतरिना कैफ असल्यामुळे सलमान आणि कतरिना आता काय जलवा दाखवतात याकडे अनेकांचं लक्ष होतं. त्या टायगर जिंदा हैचा ट्रेलर आज आला आहे. या ट्रेलरवर लोकांच्या उड्या पडल्या नसत्या तरच नवल. या चित्रपटातील कथानक इराकमध्ये घडतं. काही भारतीय नर्सचं अपहरण केलं जातं. त्यांना सोडवण्यासाठी टायगरला पाचारण केलं जातं. मग सलमान या नर्सना सोडवतो कसा हेच या सिनेमाचं कथानक आहे. ट्रेलरवरून या सिनेमात जबरा हाणामारी असणार हे उघड आहे. सलमानचा लूकही या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे. हा सिनेमा या नाताळमध्ये प्रदर्शित होतोय.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended