नाशिक : पंतग उडवण्यासाठी वापरण्यात येणारे नायलॉनचे मांजे पक्ष्यांसाठी जिवघेणे ठरत असतात. नायलॉनच्या मांजमुळे महापालिका पंचवटी विभागीय कार्यालयाच्या आवारातील पिंपळ वृक्षावर नायलॉनच्या मांजात कबुतर अडकले. कार्यालयाच्या वाहनतळ मध्ये उभ्या राहणाऱ्या अग्निशामक दलाच्या बंबाने त्वरित झाडाखाली येत बांबूच्या आकडीने पक्ष्याची सुटका केली; मात्र यावेळी मांजाने पंखाना जखम झाल्याने पुन्हा भरारी घेणे पक्ष्याला शक्य झाले नाही.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews