फिटनेस फ्रिक मिलिंद सोमण प्रेयसी फक्त 18 वर्षांची | Bollywood Latest News In Marathi

  • 3 years ago
फिटनेस फ्रिक मिलिंद सोमण या ना त्या कारणावरून बातम्यांमध्ये असतोच पण या वेळेस तो चर्चेत आहे त्याच्या प्रेम प्रकरणाविषयी. आता तुम्ही विचार कराल यात काय ? तर खरी गोम आहे इथे मिलिंद ५१ वर्षांचा आहे तर त्याची प्रेयसी फक्त १८ वर्षांची आहे. मिलिंद त्याच्या प्रेयसीसोबत मुंबईत आयोजित ‘अॅमेझॉन इंडिया फॅशन वीक २०१८’ मध्ये रॅम्प वॉक करताना पाहण्यात आला. या रॅम्प वॉकवेळी मिलिंद जेव्हा अंकितासोबत आला तेव्हा साऱ्यांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. मिलिंदने अंकितासोबतचा फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला. वृत्तानुसार अंकिता कोनवार ही एक एअर हॉस्टेस असून, हे दोघे गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून एकमेकांना डेट करत आहेत. मिलिंदने त्याची प्रेम कहाणी सोशल मीडियावरही शेअर केली आहे. त्याचबरोबर अंकितासोबतचे अनेक फोटोदेखील त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वयाच्या ५० व्या वर्षी मिलिंदने अल्ट्रामॅरेथॉन स्पर्धा जिंकून ‘आयर्न मॅन’चा किताब पटकावला होता.

Recommended