Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कोल्हापूर - अधूनमधून कोसळणा-या हलक्या पावसाच्या सरी, सनई चौघडाचे सूर, व-हाडी मंडळींची लगबग, सोबतीला वाद्यवृंद व सजलेले वधू-वर,संस्थेतील मुली व उपस्थित पाहुण्यांचा ओसांडून वाहणारा उत्साह अशा मंगलमयी वातावरणात बुधवारी तेजस्विनी महिला वसतीगृहातील ‘ऋणी’ आणि ‘पूजा ’ या दोन कन्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
कसबा बावडा येथील त्र्यंबोली मंगल कार्यालयात दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांच्या मुहूर्तावर झालेल्या विवाह सोहळ्यात संस्थेची कन्या पूजा हिचे पालकत्व स्विकारलेल्या विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील व त्यांच्या पत्नी रुपाली यांनी; तर दुसरी कन्या ऋणी हिचे कन्यादान जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहीते यांनी केले. उपस्थितांचे स्वागत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. डी. मोहिते व अधिक्षीका ज्योती पाटील यांनी केले.

Category

🗞
News

Recommended