बहिष्कृत केलेल्या कुटुंबाने जातपंचायती विरोधात दाखल केली तक्रार

  • 3 years ago
जोडीदाराकडून घटस्फोट हवा असल्यास न्यायालयात अर्ज दाखल करावा लागतो. रीतसर न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतरच घटस्फोट दिला जातो. परंतु घटस्फोटासाठी जातपंचायतीकडे न जाता न्यायालयात अर्ज दाखल केल्याने कुटुंबाला बहिष्कृत केल्याची धक्कादायक घटना वाकड परिसरात घडली आहे. या प्रकरणी बहिष्कृत केलेल्या कुटुंबाने जातपंचायती विरोधात तक्रार दाखल केली आहे. नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया.