Pandharpur: विठ्ठल मंदिरात घुसण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा प्रयत्न

  • 3 years ago
पंढरपूर (सोलापूर) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरासह राज्यभरातील देवस्थाने भाविकांसाठी खुली करावीत, या मागणीसाठी आज (सोमवारी) भाजपच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात आले. दरम्यान, पंढरपुरातील भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी संत नामदेव पायरीजवळ आंदोलन केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी विठ्ठल मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले. यामुळे पुढचा अनर्थ टळला. या आंदोलनामध्ये भाजप आमदार समाधान आवताडे, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम पापळकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के, तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, भाजप किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली हळणवर, भाजप आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जोगदंड, प्रणव परिचारक आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
(बातमीदार व व्हिडिओ : नारत नागणे, पंढरपूर)
#pandharpur #pandharpurtemple #protestovertempleentry #protestinpandharpur #bjpprotest #bjp #pandharpurtempleprotest

Recommended