आषाढी एकादशीनिमित्त आषाढी एकादशीच्या वारीची परंपरा कोरोना निर्बंधांमुळे स्थगित होऊ नये यासाठी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरला जाणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा आज औपचारिक प्रस्थान सोहळा पार पडला. आज वट पौर्णिमेच्या मुहूर्तावर सकाळीच धर्मदाय सहआयुक्त जयसिंग झपाटे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.