संपूर्ण वर्षभरामध्ये साधारणता: चोवीस एकाद्शी येतात. प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षात एक व शुक्ल् पक्षात एक. वर्षात अधिक मास आल्यास दोन एकादशी वाढतात. या सर्वांमध्ये आषाढी आणि कार्तिकी एकाद्शीस अनंन्य साधारण महत्व आहे. असे मानण्यात येते की, आषाढी एकाद्शीस भगवान श्रीविष्णु हे झोपी जातात म्हणुन त्यांस शयनी एकादशी असेही म्हणतात व कार्तिकी एकादशीस प्रबोधिनी असे एकाद्शी म्हणतात, कारण या दिवशी भगवान श्रीविष्णु जागे होतात.