शंकर महादेवन यांच्या सुरेल आवाजात गणपती अथर्वशीर्ष! Shankar Mahadevan Ganpati Atharvashirsha
  • 3 years ago
आपल्या देशातील प्रसिद्ध गायक Shankar Mahadevan यांनी सुरेल आवाजात गणपतीचे अथर्वशीर्ष गायले आहे. अगदी बालपणापासूनच शंकर महादेव यांना गणपती बाप्पा प्रचंड आवडत असायचे. सगळ्या आराध्य दैवतांमध्ये गणपती बाप्पा हे त्यांचे सर्वात आवडते दैवत होते. त्यामुळे त्यांची गणपती बाप्पावर मोठ्या प्रमाणात श्रद्दा व भक्ती आहे. अथर्व म्हणजे शांती व शीर्ष अर्थातच मस्तक असा अथर्वशीर्षचा अर्थ होतो. अथर्वशीर्ष एकल्यामुळे किंवा बोलण्यामुळे आपल्या मस्तकाला शांती मिळते. भगवान जैमिनीऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्रलऋषी यांनी साममुद्गल गणेशसूक्त लिहिले. त्यानंतर त्यांचेच शिष्य गणकऋषी यांनी गणपतीचे अथर्वशीर्ष लिहिले. अथर्वशीर्षामध्ये एक महत्वाचा बदल असतो तो म्हणजे स्तुती आधी आणि ध्यान नंतर असते. चला तर मग बघूया शंकर महादेवन यांनी त्यांच्या सुरेल आवाजाच गायलेले गणपती बाप्पाचे अथर्वशीर्ष -

#ShankarMahadevan #GanpatiAtharvashirsha #LokmatBhakti #AtharvashirshabyShankarMahadevan #AtharvaShrshaSong #GanapatiSongs #GanapatiAtharvashirshaSong
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended