Nanded : 'मराठा मूक मोर्चा' पुन्हा एकदा एल्गार ! हजारोंच्या संख्येने आंदोलन

  • 3 years ago
Nanded : 'मराठा मूक मोर्चा' पुन्हा एकदा एल्गार ! हजारोंच्या संख्येने आंदोलन

Nanded : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज राज्यभर मूक आंदोलन करण्यात येतंय. या आंदोलनाची सुरुवात नांदेड येथून होत असून, छत्रपती संभाजीराजे उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर 11 वाजता मूक आंदोलनाला सुरुवात होणार आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील नऊ आमदार आणि तीन खासदारांना देखील निमंत्रित करण्यात आलंय. जर सरकारने मराठा समाजाच्या या मागण्या मान्य केल्या नाही. त्यानंतर लाल महाल, पुणे ते मुंबई विधानभवनपर्यंत लाँग मार्च होणार आहे कोल्हापूरपासून मूक आंदोलनाची सुरुवात करण्यात आली होती. यानंतर नाशिकमध्ये देखील मूक मोर्चा करण्यात आला. तर, राज्य सरकारने मराठा समाजाच्या असलेल्या काही मागण्या मान्य करून तात्काळ पावले उचलण्याचे आश्वासन दिल्यानंतर संभाजीराजे यांनी मूक आंदोलन स्थगित करत असल्याचे घोषित केले होते. आता दीड महिन्यानंतर संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा मूक आंदोलनाची घोषणा केली.

#MarathaMorcha #marathaarakshan #Nanded