मंत्र्यांनी धोरणात्मक निर्णय विचार करुन जाहीर करावेत- देवेंद्र फडणवीस

  • 3 years ago
राज्यात अनलॉकसंबंधी झालेल्या गोंधळावरुन राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. मंत्र्यांनी धोरणात्मक निर्णय विचार करुन जाहीर करावेत असा सल्लाही त्यांनी दिला आहे. ज्या मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे त्यांच्याकडून कोणतंही वक्तव्य येत नाही आणि त्याआधी पाच मंत्री बोलतात. प्रत्येक मंत्री जाहीर करतो आणि ही घोषणा मुख्यमंत्री करतील असं सांगतो अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.

#DevendraFadnavis #UddhavThackeray #MahaVikasAghadi #VijayWadettiwar