अंत्यविधीला गर्दी : एक किमीचा परीसर सील, ४५ जणांना अटक

  • 3 years ago
सोलापूर मधील सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या अंत्यविधीला काल हजारोंच्या संख्येने माणसं जमली होती, याबाबत आपत्ती व्यवस्थापन नियमांचा भंग केल्यामुळे 200 हून अधिक जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील 45 जणांना सोलापूर पोलिसांनी अटक करून रॅपिड अँटीजेन टेस्ट केली. त्यातील एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. या घटनेमुळे करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणूनकरण म्हेत्रे यांच्या सोलापुरातील घराचा एक किमीचा परिसर पोलिसांनी बॅरीके़ड्स लावून सील केला आहे.