मांजरी बुद्रुक येथे रिपाइंने केले पाणी टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन | Pune | Sakal Media |
  • 3 years ago
मांजरी बुद्रुक गावातील पाणी पुरवठा सुरू करावा,येथील विविध नागरी प्रश्नांवर गजेंद्र मोरे सह कार्यकर्त्यांनी केले आंदोलन


मांजरी बुद्रुक गावातील पिण्याचा पाणी पुरवठा पेयजल योजना सुरू करण्यात यावा,मांजरी रेल्वे उड्डाणपूलाचे काम जलद गतीने व्हावे,गेले अनेक वर्षे झाले रस्त्याचे रखडलेले रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे ,मांजरी परिसरात कचरा दुर्गंधी पसरलेली आहे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने मांजरी बुद्रुक गावातील के.के.विद्यालयातील असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजना बांधलेल्या पाणी टाकीवर चडून कार्यकर्त्यांनी शोले स्टाईलने आंदोलन करीत प्रशासनाचा घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त करीत धरणे आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे जिल्हा युवक अध्यक्ष गजेंद मोरे यांनी केले होते.,रिपाइं कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.मांजरी बुद्रुक गावाला पाणी पुरवठा योजनेस 2016 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली, तद्नंतर 2017 निविदा निघाली, एकूण योजना 43 कोटीची असून हे काम मंगलदास इन्फ्राट्रक्चरला मिळाले,हि योजना 24 महिन्यात काम पुर्ण होणे असताना 2021 उजाडलेतरी काम लवकर होत नसल्याने अतिशय धिम्या गतीने काम होत असल्याने ,मांजरी बुद्रुक गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने पाणी टाकीवर चडून कार्यकर्त्यांना आंदोलन करावे लागले.हि योजना लवकर पूर्ण करावी,रस्त्याचे व रेल्वे उड्डाणपूलाचे रखडलेले काम लवकर पुर्ण करावे,मांजरी परिसर कचरामुक करावा अशी मागणी पुणे जिल्हा युवक अध्यक्ष गजेंद मोरे यांनी निवेदन देत शोले स्टाईलने आंदोलनाने केली आहे.Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended