राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी : आंनदराव अडसूळ | Amravati | Maharashtra | Sakal Media |

  • 3 years ago
बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि शिवसेना नेते व अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यातील वाद पुन्हा शिगेला पोहोचला आहे. रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी अडसूळविरोधात ईडी कार्यालयात कागदपत्रे सादर करून चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर आता आनंदराव अडसूळ यांनी उत्तर दिले आहे. ईडी ही केंद्रीय एजन्सी असून, त्या माध्यमातून शिवसेना नेते व पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या वतीने होत आहे. संजय राऊत यांच्या पत्नीची चौकशी ही एक बदनाम करण्याचे कटकारस्थान आहे. राज्यातील सत्ता गेल्याने महाविकासआघाडीतील नेते कशे अडचणीत आणता येईल हाच प्रकार सध्या भाजपकडून होत आहे, असेही शिवसेना नेते व माजी खासदार आंनदराव अडसूळ म्हटले. (व्हीडिओ - प्रशिक मकेश्वर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended