कोल्हापूर न्यूज बुलेटीन| आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

  • 3 years ago
- नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पराशरांना महाविष्णूस्वरूपात दर्शन रूपात सालंकृत पूजा बांधली.

- शारदीय नवरात्र उत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी महापालिकेने रंकाळा चौपाटी परिसर, पंचगंगा घाटासह शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवून परिसर स्वच्छ केला.

- सारथी संस्थेच्या मागण्यांविषयी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत लवकरच बैठक घेऊ, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

- महाराष्ट्रात दोनशे एकर जागेत इलेक्‍ट्रॉनिक्‍स पार्क उभारल्यास हार्डवेअर व सॉफ्टवेअर या दोन्ही क्षेत्रातील कंपन्या एकत्रित कार्य करू शकतील, असे आश्वासन शिक्षण, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, माहिती तंत्रज्ञान व दळणवळण खात्याचे केंद्रिय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिले.

बातमीदार - अमोल सावंत

व्हिडीओ - मोहन मेस्त्री

Recommended