आयुष्यात चालत राहण्यासाठी पाय नव्हे तर जिद्द लागते

  • 3 years ago
महेश यांच्या आयुष्याची गोष्ट दुःखद असली तरी त्यांची जिद्द कौतुकास्पद आहे. लहानपणी विजेच्या धक्क्याने दोन्ही हात व पाय गमावलेल्या महेशने, पदवी शिक्षणापर्यंत मजल मारली व स्वतःची शिकवणी सुरू केली. गेली वीस वर्षे ते विद्यार्थ्यांना इंग्रजी व्याकरणाचे धडे गिरवायला शिकवत आहेत.आयुष्यात चालत राहण्यासाठी पाय नव्हे तर जिद्द लागते हे त्यांनी स्वतःच्या वाटचालीतून जगाला पटवून दिले आहे.


बातमीदार : आकाश खाडके


व्हिडिओ जर्नलिस्ट : बी.डी.चेचर