अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या धरणात किती पाणी पहा

  • 3 years ago
अकोले : कोथळे , बलठन , टिटवी लघुपाटबंधारे भरले तर भंडारदरा ७० टक्के पार , पाऊस सुरूच घाटघर येथे ५ इंच तर रतनवाडी येथे ४ इंच पावसाची नोंद झाल्याने भंडारदरा जलाशयात पाण्याची आवक वेगाने होत आहे . जलाशयात २६९ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाल्याने ७७१७ दशलक्ष घनफूट साठा आहे ,त्यामुळे ७० टक्के जलाशय भरले आहे . तर वाकी जलाशयात ११२. ६६दशलक्ष घनफूट साठा असून ७८९ क्यूसेसने विसर्ग सुरु आहे . त्यामुळे कृष्णवंती वाहत असून रंधा धबधबा अवतीर्ण होऊन निळवंडे जलाशयात पाण्याची आवक ६४ दशलक्ष घनफूट झाली असून ४९०९ दशलक्ष घनफूट साठा उपलब्ध आहे . ५८. ८४ टक्के जलाशय भरले आहे . . तर मुळा नदीतून २६३५ क्युसेक्सने प्रवाह सुरु आहे

#sakalnews #viral #nagarnews #trending #marathinews

Recommended