पुस्तक विकत घेण्याची गरज नाही; अशी करा पहिली ते १२ वीपर्यंतची पुस्तके डाऊनलोड

  • 3 years ago
असे मिळवा ऑनलाईन पीडीएफ पुस्तक

बालभारतीने (ईबालभारती) एक संकेतस्थळ दिले आहे. http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx    या संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर ईबालभारतीचे पेज दिसेल. त्यावर सिल्याबस इअरमध्ये २००६ पासून २०२० पर्यंत वर्ष दिली आहेत. त्यामध्ये ज्या वर्षाचे पुस्तक हवे आहे. त्या वर्षाला किल्क करावे. 
या पेजवर बुक टाईप्समध्ये टेक्स बुक, टिचर्स हँडबुक, वर्कबुक, ऑदर बुक व किशोर खंद असे विभाग दिले आहेत. त्यातून जे हवे त्याला क्लिक करावे लागेल.
क्लासमध्ये पहिली ते १२ पर्यंतचे वर्ग दिले आहेत. याबरोबर नो क्सास असे ही ऑप्शन दिले आहे. या क्लिक केल्यानंतर काहीच दिसत नाही. 
मिडीयममध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, तेलगु, कन्नड, तमीळ, बंगली आदी भाषा दिल्या आहेत. 
सब्जेकटस्‌मध्ये भाषा (भाषेची पुस्तके), गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, पर्यावरण ऑदर आदी पुस्तके  दिली आहेत.