अभिनेत्री प्रिया तुळजापूरकर आरोग्य जपण्याचा सल्ला देत आहे

  • 3 years ago
सध्या "रंग माझा वेगळा' या मालिकेतून नाशिककरांची आवडती असलेली अभिनेत्री प्रिया तुळजापूरकर हिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. याशिवाय या गोजिरवाण्या घरात, क्‍यों की सॉंस भी कभी बहू थी, कसम से, क्राईम डायरी, भाग्यलक्ष्मी यासारख्या विविध मालिका तसेच बाळूमामाच्या नावानं चांगभलं, लपून छपून, जय अम्बे मॉं यासारख्या विविध चित्रपटांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. सध्या चित्रीकरण बंद असल्याने पूर्ण वेळ घरातच थांबून योगासने आणि प्राणायामांच्या सहाय्याने आपले शारिरीक आणि मानसिक आरोग्य जपत आहे आणि आपल्या रसिक प्रेक्षकांनाही आरोग्य जपण्याचा सल्ला देत आहे.