नागपुरातील 'ही' धरणं तुडुंब; पाहा व्हिडिओ!

  • 3 years ago
#SakalMedia #Rain #Dam #Nagpur #River #Vidarbha #Damfull
नागपुरातील 'ही' धरणं तुडुंब; पाहा व्हिडिओ!
पारशिवनी, कन्हान, खापरखेडा (जि. नागपूर) - मध्यप्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कन्हान नदीला यावर्षी पहिल्यांदा पूर आला आहे. यातच पेंच नदीवरील तोतलाडोह व नवेगाव खैरी ही दोन्ही जलाशये पूर्णतः भरली असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने पारशिवनी, कामठी, मौदा व कुही तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.


तोतलाडोह आणि नवेगाव खैरी धरण तुडूंब भरलेला असून धरणाचे तोतलाडोह धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आले आहे, तर नवेगाव खैरी धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत. पेंच व कन्हान नदीकाठच्या गावातील लोकांना प्रशासनाला तर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. 1994 नंतर कन्हान नदीने रौद्र रूप धारण केले असून नदीकाठावर बघ्यांची गर्दी वाढलेली आहे.

---------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com