Mutha Chambers

  • 3 years ago
पुणे - सेनापती बापट रस्त्यावरील मुथा चेंबर या आठमजली इमारतीला गुरुवारी सायंकाळी लागलेल्या आगीत पाच ते आठ असे चार मजले जळून खाक झाले. आग लागली तेव्हा इमारतीत सुमारे दीडशे कर्मचारी होते. सहाव्या मजल्यावरून धूर येताच त्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांना मिळाल्याने सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.