स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजही गावकरी राहतात कुड्याच्या घरात | umarkhed| Nagpur| Banjara community

  • 3 years ago
उमरेड (जि. नागपूर) : देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्षे झाली. मात्र, ग्रामीण भागात मूलभूत सोयी सुविधा पोहोचलेल्या नाहीत. लोकप्रतिनिधी जास्तीतजास्त शहरांच्या सर्वांगीण विकासाला भर देत कामं करतात. खेड्यांकडे पाठ फिरवतात. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे उमरेड तालुक्यातील ‘मांडवा टोला’ हे गाव.
स्वातंत्र्यपूर्व काळात हाच बंजारा समाज मूळ राजस्थान येथून स्थलांतरित होऊन महाराष्ट्राच्या जंगलांमध्ये वस्ती करून राहू लागला. कारण, त्या काळात त्यांना समाजात स्थान मिळत नसे. इंग्रजांनी लादून दिलेल्या जाचक अटींमुळे त्यांचे जगणे कठीण झाले होते. ते जर वस्तीत दिसले तर गुन्हे दाखल करून शिक्षा ठोठावली जात असे. म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी जंगलातच वसाहत करून राहणे पसंत केले. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी आजच्या उमरेड दक्षिण वन परिक्षेत्राचे हद्दीतील एका उंच डोंगर पठारावर या बंजारा समाजाच्या काही लोकांनी आपला डेरा टाकून राहणे पसंत केले. (व्हिडिओ - सतीश तुळसकर)