महाशिवरात्री विशेष: आजपर्यंत कैलास पर्वतावर कोणी का जाऊ शकलं नाही?

  • 3 years ago
आज महाशिवरात्री... कैलास पर्वंत आणि शंकराचं नातं अविभाज्य आहे. कैलास पर्वत हे हिंदू, जैन व बौद्ध धर्मीयांसाठी अतिशय पवित्र असं स्थळ आहे जे तिबेटच्या पठारावर आहे. या पर्वतावर शिव-पार्वतीचं निवासस्थान आहे, अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे. या पर्वतावर आजतागायत कुणीही चढाई करु शकलेले नाहीये. त्यामुळे या पर्वताकडे एखाद्या रहस्याप्रमाणेच पाहिलं जातं. काय आहेत यामागची कारणे? कुणीच गिर्यारोहक आजतागायत इथे चढाई का बरे करु शकला नाहीये, याचीच माहिती आपण आज घेणार आहोत...
कैलाश या पर्वताचा आकार शिवलिंगाप्रमाणे आहे. चारी बाजूने तयार झालेल्या हिमनद्यांच्या घळ्या ह्या एखाद्या पिंडीप्रमाणे दिसतात. या पर्वताची उंची 6638 मीटर इतकी आहे. या पर्वतावर सिंधू, ब्रम्हपुत्रा आणि सतलज अश्या महत्त्वाच्या नद्या या पर्वतावर उगम पावतात. कैलाश पर्वताची ही उंची जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या एव्हरेस्टपेक्षा तब्बल 2200 मीटरनी कमीच आहे.
#Mahashivratri #Kailasa #KailasaTemple #KailasParvat #Shiva #LordShiva #Sakal #SakalMedia