सत्य लपवण्यासाठी भाजपच्या नगरसेवकावर दबाव आणला जात आहे :जगदीश मुळीक

  • 3 years ago
घोरपडी, ता.६: "वानवडी पोलीस भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सरकारच्या दबावामुळे करत आहेत. या केसमध्ये एक मंत्र्याचा राजीनामा घेतला असून त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ नये. तसेच सत्य लपवण्यासाठी आणि भाजपच्या नगरसेवकावर दबाव टाकण्यासाठी अशी नोटीस पाठवली जात आहे. आम्ही कोणत्याही नोटीसीला घाबरणार नाही" असे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.