तमनाकवाडीत चाळोबा गणेश | Kolhapur | Elephant

  • 3 years ago
कोल्हापूर : चंदगड तालुक्‍यातील पाटणे जंगलात असलेले हत्तीचे ‘ते’ कुटुंब कोकणात उतरून महिना झाला. वन विभागाने हत्ती व मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी हत्तींच्या कळपाला कुटुंबाची उपमा देत अण्णा, बारक्‍या, माय अशी नावे दिली. तोच कित्ता आता या जंगली भागात दृढ झाला. त्याचाच भाग म्हणून आजऱ्यातील एक हत्ती तमनाकवाडा, सेनापती कापशीत आला, तोच चाळोबा गणेश नावाने ओळखला गेला. या उत्स्फूर्त नामकरणामुळे कोणता हत्ती कोठे आहे, हे ओळखणे सुलभ झाल्याचे अधोरेखीत झाले.

काही महिने आजऱ्याच्या चाळोबा जंगलातील टस्कर हत्ती गेल्या दोन दिवसांपासून कागल तालुक्‍यातील सेनापती कापशीत आला. त्या हत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी वनक्षेत्रपाल सुधीर सोनवणे त्यांचे पथक येथे तैनात आहे. चंदगड आजऱ्यातील हत्तींची काही गुणवैशिष्ठ्ये नोंदविणारे प्रभारी वनक्षेत्रपाल दत्ता पाटीलही कापशीला आले. पाटील म्हणाले, की चाळोबा गणेश नावाने आजऱ्याचा हत्ती ओळखला जातो. तो नर आहे. त्याचा एक सुळा अर्धवट आहे. त्याचे वावरक्षेत्र मोठे आहे. चंदगडपासून गगनबावड्यापर्यंत तो येऊन गेला आहे. सन २०१९- २० मध्ये आजरा तसेच चंदगडात त्याचा वावर होता.'