पुणे : वीज बिल वाढीविरोधात आंदोलन करणारे मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

  • 4 years ago
वाढीव वीज देयकाविरोधात गुरुवारी मनसेकडून पुण्यामध्ये मोर्चा काढण्यात आला. वाढीव वीज देयकाविरोधात गुरुवारी मनसेने शनिवार वाडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन केलं होतं. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळे पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारात मनसे कार्यकर्त्यांचा ठिय्या आंदोलन केलं.

Recommended