Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबाबत जेवढी हळहळ व्यक्त केली जात आहे तेवढच ते चिघळत चालंल आहे. सुशांतच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, बॉलिवूडच्या काही मंडळींनी त्याला बॅन केल्यामुळे सुशांतने टोकाचे पाऊल उचलले असल्याचं सध्या बोललं जात आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येवरुन अनेक तर्कवितर्क लावले जात असताना एक नवे अपडेट समोर येत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खान , निर्माता करण जोहर , संजय लीला भन्साली आणि एकता कपूर यांच्यासह 8 जणांविरुद्ध बिहारच्या मुज्जफरपूर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण स्थानिक वकील सुधार कुमार ओझा यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

Category

😹
Fun
Be the first to comment
Add your comment

Recommended