साहित्य संमेलन उद्घाटनापूर्वीच आरएसएस स्वयंसेवक आणि पोलिसांत राडा, पोलिसांच्या चौकशीमुळे ग्रंथदिंडी संमेलनस्थळी आल्यावर बाचाबाची

  • 4 years ago
उस्मानाबाद- अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि वाद-विवाद जुनंच नातं आहे उस्मानाबादेतील साहित्य संमेलन फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेत होत असल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यापूर्वीच त्यांच्या नावाला आक्षेप घेतला होता त्याचे पडसाद शुक्रवारी(१० जानेवारी) ग्रंथ प्रदर्शनात उमटले एकीकडे ग्रंथदिंडी संमेलन स्थळी आलेली असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ग्रंथविक्री स्टॉलवर जबरदस्त राडा सुरू झाला दिब्रिटो यांच्यावरील आक्षेपार्ह पुस्तिका मोफत दिली जात असल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक पी व्ही माने यांनी स्वयंसेवकांची चौकशी केली त्यावेळी सोमेश कोलगे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली

Recommended